सर्वधर्मीय वधुवर परिचय मेळाव्यात २ विवाह जुळले

0

दीडशेवर इच्छुकांनी दिला परिचय

जळगाव ;– येथील स्वयंप्रकाश फाउंडेशनतर्फे २५ रोजी वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन बालगंधर्व नाट्यगृह येथे सकाळी १० वाजता करण्यात आले होते . या सर्वधर्मीय वधुवर परिचय मेळाव्यात २ विवाह जुळले तर दीडशेवर इच्छुकांनी आपला परिचय करून दिला . मेळाव्याला माजी मंत्री सुरेशदादा जैन, आ. राजूमामा भोळे , महापौर ललित कोल्हे , राजेश झाल्टे, जीवन कृष्णाजी अहिरे, अध्यक्ष अनिल बिर्हाडे आदी उपस्थित होते . यावेळी सुरेशदादा जैन यांच्याहस्ते सर्व धर्मीय वधु वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
करीम सालार यांनी यावेळी जुळून आलेलं विवाह साठी संसारो उपयोगी वस्तू भेट देणार असल्याचे जाहीर केले . तसेच राजूमामा भोळे यांनी ही जोडप्यांना मिक्सर आणि कपाट देणार असल्याचे घोषित केले, राजेश झाल्टे यांनी या मेळाव्यात जे काही ही मदत लागणार असल्यास मी त्यासाठी सदैव प्रयत्नशील असेल असे सांगितले .
सेवा निवृत्त कर्मचारी संगठनेचे सूर्यवंशी यांनी प्रत्येकी जुळून आलेले जोडप्यांना ५००१ रु प्रोत्साहन बक्षीस म्हणून देणार असल्याचे म्हटले .
या मेळाव्यात १०० ते १५० लोकांनी आपला परिचय दिला आणि दहा लोकांचे योग जुळून आले
सर्व धर्मीय मेळाव्याचे आयोजन हे पहिल्यांदा करण्यात आला तरी ही याला भरपूर लोकांकडून सहकार्य लाभले असे फाऊडेशनचे अध्यक्ष अनिल बिऱ्हाडे आणि सामाजिक कार्यकर्ते अंबादास मोरे यांनी सांगितले या वेळी मंगला बारी याशोदाताई तायडे, वि के साळुंखे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते . या मेळाव्यात जे विवाह जुळतील त्यांची कॉन्सिलिंग करून त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच लग्न लावणार असल्याचे आयोजकांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.