सर्जिकल स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींची बैठक

0

नवी दिल्ली :- पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक २’ची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. पण यंदाचा हा सर्जिकल स्ट्राईक हवेतून करण्यात आला. वायुदलाच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.

सर्जिकल स्ट्राइकनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना या कारवाईची संपूर्ण माहिती दिली आहे. यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला मोदींसह अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

भारतीय हवाई दलायच्या या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत, भारतीय वायुदलाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटलं की, ‘भारतीय वायुदलाच्या जवानांना सलाम.’ जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अबदुल्ला सह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वायुसेनेचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.