आरोपीवर हद्दपारिची कारवाई
भुसावळ :- शहरातील खडका रोड लाल बिल्डिंगजवळील नॅशनल मेडिकल समोर मुक्ताईनगर येथील अरबाज शकील आझाद (वय 22,ह.मु.खडका रोड भुसावळ) हा डि.एल.महाविद्यालयात प्रवेशासाठी जात असतांना सराईत गुन्हेगार आसिफ बेग (उर्फ) बाबा काल्या असलम बेग याने फिर्यादीस अडवुन जबरीने त्यांच्या खिशातुन ६ हजार २०० रु हिसकावून प्रतीकार केला असता फिर्यादीस चाकु मारुन दुखापत केली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात भाग ५गुरन. ३७२/१९ भादवि कलम ३९४,३०७,३४१ व ३४प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. घटना घडल्यापासून आरोपी फरार होता.आरोपीचा पोलीसांकडून कसुन शोध सुरु होता.
दि.१६ जुलै रोजी रात्री आरोपी आसिफ बेग (उर्फ) बाबा काल्या असलम बेग हा भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनी भागात कैला देवी मंदिराजवळ आला असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो .ना.दिपक जाधव,रविंद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर,पोकाँ. कृष्णा देशमुख,प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील,राहुल चौधरी, चालक बंटी कापडणे यांचे पथक तात्काळ तेथे गेले. पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आले असल्याचे बघितल्यावर त्याने तेथुन पळायला सुरुवात केली.परंतु काही अंतरावरच त्याला पकडण्यात पोलीसांना यश आले.
आरोपी आसिफ बेग (उर्फ) बाबा काल्या असलम बेग हा बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्ड वरील सराईत अट्टल गुन्हेगार असुन त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल असून हद्दपारीची कारवाईही करण्यात येणार आहे.