जळगाव (प्रतिनिधी)- येथे सरस्वती विद्या मंदिर शिव कॉलनी शाळेत मातृ पितृ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर पालकांना व्यासपीठावर बसवून मान सन्मान देण्यात आला.विद्यार्थ्यांनी देशाचे रक्षण करणारा जवान तसेच आई वडील यावर भाषण सादर केले. भाषणांमधून आई वडीलांच्या प्रेमाची महती सांगितली.
एेस्वर्या बारी हिने आई वडील ची पूजा रोज केली तरी कमीच आहे आई वडील ईश्र्वराची रूप असतात या वाक्यांमधून उपस्थितांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग स चे अध्यक्ष मनोजकुमार पाटील उपस्थित होते त्यांनी भाषण सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले..यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन सविता ठाकरे यांनी केले. विद्यार्थ्यांना बालवयापासून योग्य संस्कार व्हावे म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमो ल यांनी केले. सहकार्य नीलिमा भारंबे उज्वला ब्राम्ह नकर,सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांचे लाभले.

