सरस्वती विद्या मंदिर मधे बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला

0
जळगाव (प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिर मध्ये बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. समारंभाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वर्षभरात हस्ताक्षर , क्रीडा, डान्स, कलाकृती, रंगभरन  स्पर्धा घेण्यात आल्या यात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ग. स. अध्यक्ष मनोजकुमार पाटील, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे , कल्पना वसाने मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व पारितोषिक बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचलन व मनोगत सुवर्णलता अडकमो ल यांनी केले.सहकार्य निलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर्, सविता ठाकरे, मयुर कणखर यांचे लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.