सरस्वती विद्या मंदिरात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0

जळगाव – येथे सरस्वती विद्या मंदिर मधे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच हुतात्मा स्वतंत्र सेनानी ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांनी  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण केला.

यावेळी ग स चे अध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठ रोगा विषयी मार्गदर्शन करून शारीरिक स्वच्छताचे महत्व सांगितले. तर सुवर्णलता अडकमोल यांनी महात्मा गांधी व हुतात्मा विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.  या कार्यक्रमा मधून विद्यार्थ्याना शारीरिक स्वच्छता संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले तर सहकार्य नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हांकर, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.