सरकारी योजनांची भीक नको तर शेतमाल हमीभावाचा हक्क हवा

0

जळगाव प्रतिनिधी

म. गां. शि.मंडळ संचालित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडून चुंचाळे गावातील शेतकर्‍यांचे नुकतेच आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले. कबचौ उमवी जळगाव च्या अर्थशास्त्र विषयात व च्या विद्यार्थ्यांना कृषी अर्थशास्त्र हा विषय अभ्यासक्रमासाठी आहे. समाजाशी विषयाशी असणारी बांधिलकी व ग्रामीण भागातील शेतकरी वर्गांची परिस्थिती विद्यार्थ्यांना समजावी हा या सर्वेक्षणामागचा प्रमुख उद्देश असल्याचे अर्थशास्त्र विभागप्रमुख व सर्वेक्षणाचे समन्वयक प्रा.विशाल हौसे यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी शेतकर्‍यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती समजेल अशी 30 प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली होती. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांचे 6 गट तयार करण्यात आले होते ,प्रत्येक गटात 4 विद्यार्थ्यांचा सहभाग होता .साधारणपणे 60 शेतकर्‍यांची मुलाखत घेऊन शेतकर्‍यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला .
सदर सर्वेक्षणात असे दिसून आले कि बहुतांशी शेतकर्‍यांकडे असणारी शेती ही वडिलोपार्जित शेती आहे.चुंचाळे येथील शेतकरी जिरायती व बागायती अशा दोन्ही प्रकारची शेती करताना दिसून आले.काही प्रयोगशील शेतकरी वगळता बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करताना दिसून आले. शेतकर्‍यांना अनेक समस्या भेडसावतात महत्वाची समस्या म्हणजे शेतीतील उत्पादन हे स्थिर स्वरूपाचे नाही.निसर्गाच्या लहरीपणाचा व सरकारी धोरणाचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.समाधानाची बाब म्हणजे जलसिंचनाच्या साधनांचा वापर दिसून आला. एकूण शेतकार्‍यांपैकी 10% शेतकरी हे प्रयोगशील शेतकरी दिसून आले ,हे शेतकरी कृषी विषयक वेगवेगळ्या परिसंवादामध्ये उपस्थिती देतात,कार्यशाळेमध्ये सहभागी होतात,प्रश्न विचारतात ,प्रशिक्षण घेतात,अभ्यास करून नवनवीन पिकाची लागवड करतात त्यात प्रामुख्याने (पान 2 वर)

Leave A Reply

Your email address will not be published.