सरकारी तिजोरीत पहिल्यांदाच 1.20 लाख कोटीचा जीएसटी जमा

0

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-22 साठी Budget 2021 सोमवारी संसदेत सादर होणार आहे. निर्माला सीतारामन अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. बजेट सादर होण्याआधी सरकारसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. जानेवारीमध्ये 1.20 लाख कोटी रुपये रेकॉर्ड जीएसटी कलेक्शन लं आहे. विशेष बाब म्हणजे हा आकडा जीएसटी लागू झाल्यानंतरचा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

 

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मधील जीएसटी कलेक्शन मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्के आधिक आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 31 जानेवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झालं आहे. यात 21,923 कोटी रुपये सीजीएसटी आहे. तर 29,014 कोटी रुपये एसजीएसटी आहे. आयजीएसटी 60,288 कोटी रुपये आहे.

 

डिसेंबर 21 जानेवारीपर्यंत 90 लाख जीएसटीआर-3बी रिटर्न दाखल झालं आहे. जीएसटी रिटर्न दाखल करण्याची संख्या अधिक असल्याने हा आकडा अधिक असू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.