मुंबई : ब-याच सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना हे माहीत नाही की, मोटार वाहन कायदा, १९८८(सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नागरी दावा क्र.९८५९, सन २०१३) अन्वये जर एखाद्या कर्मचा-याचे अपघाती निधन झाले आणि त्याने त्यापूर्वी सलग ३ वर्षांचा आयकर भरलेला असेल तर त्या कर्मचा-याच्या वार्षिक पेन्शन रकमेच्या १० पट रक्कम त्याच्या वारसदारास मिळते.
उदा.एखाद्या कर्मचा-यास रु.२५०००/- मासिक सेवानिवृत्ती वेतन मिळत असेल आणि त्याच्या अपघाती निधनापूर्वी त्याने सलग ३ वर्षे आयकर भरलेला असेल तर त्याला त्याचे वार्षिक सेवानिवृत्ती वेतनाची रक्कम रु.२५०००×१२=३,००,०००/- च्या १० पट म्हणजे रु. ३०,००,०००/- त्याच्या वारसदारास मिळणार. यासाठी अट एकच आहे की त्याने मागील सलग ३ वर्षांचा आयकर भरलेला असावा.

म्हणून सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे IT Returns वेळेवर भरावेत.


