जळगाव :- समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा चालक मोबाइलवर सिनेमा पाहत ट्रॅव्हल्स (एमएच १९ सीएक्स ५५५२) चालवत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला होता. ही बस जळगावच्या संगितम ट्रॅव्हल्सची असल्याचे स्पष्ट झाले असून बस आरटीओ विभागाने ताब्यात घेऊन वाहन चालकाच्या परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे..

या चालकाला पुणे आरटीओ कार्यालयात हजर करण्यात आले. रविवारी समाज माध्यमांवर लक्झरी बस चालवताना कानात हेड फोन टाकून सिनेमा पाहत चालक धोकादायक पद्धतीने बस चालवतअसल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. ही बस संगीतम् ट्रॅव्हल्सची असून ती मंगळवारी ताब्यात घेण्यात आली. संगितम ट्रॅव्हल्स कंपनीला नोटीस बजावून परवान निलंबनाबाबत खुलासा मागवण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सांगितले


