समाधानकारक ! मुंबईचा रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी मंदावला

0

मुंबई: महानगरपालिकेच्या 6 विभागांमध्ये कोरोनाचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 20 दिवसांवर गेला आहे. तर पूर्ण मुंबईचा रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी (डबलींग रेट) 13 वरुन आता 16 दिवसांवर गेला आहे. तसेच  मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील (रिकव्हरी रेट) 43 टक्के इतका झाला आहे.

विशेष म्हणजे महापालिकेच्या 24 पैकी 6 विभागांमध्ये तर कोविड रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 20 दिवस इतके असून त्यात पूर्वी हॉटस्पॉट म्हणून ओळख बनलेल्या जी/दक्षिण (वरळीचा समावेश)  जी/उत्तर(धारावीचा समावेश) एम/पूर्व विभाग (मानखूर्द) यांचाही समावेश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध कोरोना समर्पित रुग्णालये, आरोग्य केंद्र आदी मिळून आजपर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 43 टक्के रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यासमवेत मुंबईत बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 13 वरुन आता 16 दिवस इतका झाला आहे. म्हणजेच रुग्ण वाढण्याचा वेग मंदावतो आहे.  रुग्ण दुपटीच्या सरासरी 16 दिवसांच्या तुलनेत काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.