समाजातील विधवा व परित्यक्त्या महिलांना समानतेची वागणूक द्या ; प्रा. सौ.निलीमा माळी

0

भडगाव (प्रतिनिधी) : जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर आयोजित रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने जानकीनगर येथे सायंकाळी सहा वाजता विधवा व परित्यक्त्या महिलांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात नवापूर शहरातील विधवा व परित्यक्ता महिलांना एकत्रित करून त्यांच्यासाठी स्नेहमिलन आयोजित करून त्यांना स्नेहवस्त्र गुलाब पुष्प व सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तिक देऊन सत्कार करण्यात आला.

 

या माध्यमातून सुखदुःखाची देवाण-घेवाण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात  आला होता. सर्व महिलांना समान अधिकार असतात त्यांच्यावरील अचानक निर्माण झालेली परिस्थिती  महिलांचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही म्हणून अशा निराधार महिलांना  समाजात समान स्थान देण्याची गरज असल्याचे जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सचिव नीलिमा माळी यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात डॉ मंदा मोरे यांनी अभिप्राय व्यक्त करताना संवेदनशील आठवणींना उजाळा दिला. जुन्या पूर्वापार चालत आलेल्या रुढींना झुगारून आपण सौभाग्याचे सर्व अलंकार परिधान करावेत अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली.

 

विधवापण किंवा परितक्त्या असणं हा आपला दोष नसून अचानक ओढवलेली परिस्थिती असल्याचे सर्व महिलांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ नितीनकुमार माळी यांनी केले असून त्यांनी जमलेल्या सर्व महिला भगिनींचे कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ मंदा मोरे, मंगला पाटील, इंदुबाई पाटील, मंगलाबाई पाटील, कल्पना पाटील, लताबाई हिरे, विजयाबाई खैरनार, मीराबाई महारु, सुमित्रा कांबळे त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व  विधवा व परित्यक्त्या  महिला तसेच जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सर्व संचालकांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.