समाजाचा विकास आदर्श शिक्षकांमुळे होतो”- एम. एस. चौधरी

0

भुसावळ (प्रतिनिधी )- समाजाचा विकास आदर्श शिक्षकांमुळे होतो असे विचार एम. एस. चौधरी असे  राज्य सहकारी निवडणूक आयुक्त, यांनी  व्यक्त केले .

येथील भुसावळ हायस्कूलच्या प्रांगणात गुरुवार 30 रोजी आयोजित विद्यालयाच्या वार्षिक अंक ‘प्रतिबिंब’ तथा शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . प्रसंगी साने गुरुजी यांचे मूल्याधिष्ठित शिक्षण विचारातून अनेक उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.  तसेच  शिक्षक कसा असावा ? शिक्षक विद्यार्थी परायण असावा,

विदयार्थी कसा असावा ? विद्यार्थी शिक्षक परायण असावा, शिक्षक ज्ञान परायण असावा तर ज्ञान कसे असावे तसेच  ज्ञान सेवा परायण असावे असे उद्बोधन कस्न विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

याप्रसंगी अध्यक्ष ए. एन. शुक्ल यांनी सुद्धा काळानुरूप ज्ञानाच्या कक्षा आपण विस्तारित केल्या पाहिजेत असे मनोगतात सांगितले. विद्यार्थ्यांना अनेक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन  जे. एच, चौधरी, दिलीप वामन पाटील,  बी. जी. सरोदे,  व्ही. एम. महाजन,  संजय भालचंद्र पाटील,  हेमंत चौधरी मुख्याध्यापक एच. डी. धांडे, पर्यवेक्षक आर. पी. चौधरी,  एस. एस. चौधरी,  एस. आर. झांबरे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गायत्री सरोदे व मनिष गुरचळ यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी विदयार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.