समाजशास्त्रामुळे चांगला नागरिक घडण्यास मदत

0

एसएसटी विषय स्पर्धा परीक्षांचा पाया, लोकलाइव्हच्या संवादात समीरसर यांचे प्रतिपादन

जळगाव दि. 19

समाजशास्त्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा या विेयाची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. हा विषय स्पर्धा परीक्षांचा पाया असून त्यामुळे चांगला नागरिक घडण्यास मदत होते, असे प्रतिपादन इम्यानुअल कोचींग क्लासेसचे संचालक समीर शेफर्ड यांनी लोकलाईव्हशी संवाद साधताना केले.

लोकलाइव्हचे संचालक राजेश यावलकर यांच्याशी समीर शेफर्ड यांनी दिलखुलास चर्चा केली. समीरसर यांचे सेंट जोसेफ स्कूल परिसरात इम्यानुअल कोचिंग क्लासेस आहेत. ते सीबीएसी व स्टेट बोर्डाच्या 8 वी, 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्र (एसएसटी) विषय शिकवतात. बोर्डाच्या परीक्षेत यंदा त्यांच्या क्लासेसमधील 8 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहे. समाजशास्त्रात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्राचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनापेक्षा पाठ्यपुस्तकांवरच भर द्यावा. या विषयात प्रयत्न केल्यास पैकीच्या पैकी गुण विद्यार्थ्यास मिळू शकते. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सर्वाधिक भर इंग्रजी, गणित व विज्ञान विषयावर असतो. अनेक विद्यार्थीपुढे डॉक्टर, इंजिनियर बनतात. परंतु त्यांना निवडणुकीत एक चांगला उमेदवार, नेता निवडता येत नाही. चांगला नेता निवडला तरच देशाचे आणि पर्यायाने आपले भवितव्य असते. राजकीय जागृकता निर्माण करण्याचे काम समाजशास्त्र हा विषय करतो. आपल्याला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिक शास्त्रही समजणे खूप गरजेचे आहे, असे समीरसरांनी सांगितले.

स्वत:च शिकवण्यावर भर

क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्वत:च शिकवण्यावर भर असतो. इतर शिक्षकांवर पूर्णत: अवलंबून राहिले., तर ते फारसे आत्मियतेने शिकवू शकत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास, विषयाची तयारी, याबाबत गांभीर्या नसते. त्यामुळे परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी लागते. जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम, फ्रँचाइसीच्या काळातही भारतीय शिक्षण पद्धत उत्तम आहे, असे त्यांनी सांगितले.

समाजशास्त्र या विषयाला घाबरण्याची गरज नाही, तर तो हसत, खेळत शिकर्यााची आवश्यकता आहे. भुसावळमध्ये एक शाळा सुरु केली असून उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचेही समीर सर यांनी सांगितले.

क्लासेसमध्ये एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न

खासगी क्लासेस सुरु राहणे, योग्यच वाटते. या क्लासेसमध्ये एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे क्लासेस व्यवसायिक , शिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही भले होते. हुषार पिढी घडू शकते. आमच्या क्लासेसला 2009 मध्ये सुरुवात झाली. तेव्हा फक्त 5-6 विद्यार्थी असायचे. आता तर 500 च्या जवळपास विद्यार्थी आहेत. आता समाजशास्त्र विषयाचे महत्व सर्वांना पटत आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.