Saturday, October 1, 2022

समांतर रस्ते कृती समितीतर्फे जल्लोष

- Advertisement -

आतषबाजीकरुन वाटले 12 किलो पेढे : जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालकांचे केले अभिनंदन

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव –
जळगाव शहरात आठ किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची निविदा आज ऑनलाईन प्रसिध्द झाल्याचा आनंद समांतर रस्ते कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आतषबाजीसह पेढे वाटप करुन साजरा केला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व भाराराप्राचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना पेढे भरविण्यात आले. या निवेदेचा पाठपुरावा करणारे जलसंपदामंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचेही आभार समितीतर्फे मानण्यात आले.
जळगाव शहरात महामार्ग चौपदरीकरणाची 69 कोटी 26 लाख रुपये खर्चाची निविदा आज प्रसिध्द झाली आहे. या अंतर्गत खोटेनगर ते कालिंकामाता मंदिर दरम्यान चौपदरीकरण, तीन ठिकाणी वाहनांसाठी भुयारी मार्ग वएका ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग होणार आहे. ही निविदा 1 फेब्रुवारीस फायनल होईल. समांतर रस्ते कृती समितीने दि. 15 ते 26 नोव्हेंबर 2018 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करुन निविदा लवकरात लवकर काढावी अशी मागणी केली होती. तेव्हा ना. महाजन यांनी मध्यस्थी करुन महिनाभरात निवादा मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. राजे निंबाळकर यांनी दर 15 दिवसांनी आढावा घेऊ असे तर सिन्हा यांनी महिनाभरात निविदा काढू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल दि. 19 ला निविदा प्रसिध्द झाल्याचा आनंद आज कृती समितीने साजरा केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व प्रकल्प संचालक सिन्हा यांना पेढे भरविण्यात आले. ढोल ताशांच्या आवाजात नृत्य करीत जृळगावकरांना पेढे वाटप करण्यात आले. समांतर रस्ते कृती समितीचे सदस्य नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अनंत जोशी, डॉ. राधेशाम चौधरी, फारुख शेख, सुशील नवाल, दिलीप तिवारी,, अरविंद देशमुख, पृथ्वीराज सोनवणे,गजानन मालपूरे, विनोद देशमुख, सरिता माळी, शोभाताई चौधरी, राजी नायर, वैशाली पाटील, गनी मेमन, अमीत जगताप आदींसह इतरांनी आतषबाजी केली.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात छोटेखानी बैठक झाली. निविदा मार्गी लागल्यानंतर आता महामार्गावरील वीज वाहिन्या स्थलांतराचा पाठपुरावा करायचे ठरले. वीज मंडळाने 5 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी जिल्हा विकास नियोजन समितीतून निधी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सोमवारपर्यंत महामार्ग लगण अडथळा ठरणारे वृक्ष मोजून त्याची तोड करण्याची परवानगी मनपा वृक्ष समितीकडून घेऊ असेही सांगण्यात आले. मनपाने जलवाहिनी स्थलांतरासाठी विशेष सभेत ठराव सुध्दा केलेला असल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्ग रुंदीकृरणासाठी मंजूर केलेला 12 कोटी 40 लाख रुपयांचा निधी विस्तारित कामावर करण्यासाठी मा. पालकमंत्री यांना विनंती करु अशीही चर्चा झाली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या