समता शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेतील तृतीय पारेतोषीक प्राप्त ; शिक्षक ईश्वर महाजन यांचा सन्मान

0

अमळनेर प्रतिनिधी– महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते .त्या स्पर्धेमध्ये देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल चे उपशिक्षक ईश्वर रामदास महाजन यांनी ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे यावर निबंध लिहिला होता.

त्या निबंधाला माध्यमिक गटातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संघटनेच्यावतीने घोषित झाले होते. त्याचे आज वितरण एरंडोल येथे डी एस पी कॉलेजच्या सभागृहात गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ईश्वर महाजन यांना पारोळा व एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील, प्रताप काँलेजचे माजी प्राचार्य डॉ एल.ए.पाटील, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिर्हाडे,संघटनेचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाट व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या यशाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, तहसीलदार मिलींदकुमार वाघ,गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन,जळगांव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरूड,शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले,महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर,
समता शिक्षक संघटनेचे अजय भामरे, मिलिंद निकम, सोपान भवरे,क्रिडा संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.पी.वाघ, डि.डी.राजपूत, सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष बागूल सर,व सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.