समता शिक्षक परिषदेच्या जिल्हा उपक्रम विभाग उपाध्यक्ष पदी सपना रावलानी

0

भातखंडे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत जळगाव जिल्हा उपक्रम विभागाच्या उपाध्यक्षपदी झुलेलाल एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श शिंदे हायस्कूलच्या इंग्रजी विषयात उपक्रमशील असलेल्या आदर्श शिक्षिका सौ सपना रावलानी यांची नुकतीच निवड करण्यात आली.

सदर निवड ही २०२३  पर्यंत असून तशा आशयाचे पत्र त्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डि.के. अहिरे, संघटनेचे माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष प्रा भरत शिरसाठ, प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड व विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप यांच्या उपस्थितीत देण्यात आले. समता शिक्षक परिषदेमार्फत येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांना चांगल्या प्रकारे न्याय देणार असल्याचे सपना रावलानी यांनी सांगितले. याप्रसंगी संघटनेचे माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बी. एन.पाटील, प्रमोद आठवले, छाया सोनवणे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.