जळगाव ;- देशातील केंद्रशासन व भाजप सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे देशातील सामाजिक स्थेर्य ,शांतता नष्ट झाली असून २ एप्रिल रोजी भारत बंददरम्यान अनेक हिंसक घटना देशात घडल्या . त्यामुळे देशात व राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असून देशात शांतता निर्माण व्हावी समता व बंधुत्व टिकवून राहावे यासाठी काँग्रेसतर्फे नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरासमोर काँग्रेसतर्फे आज एकदिवसीय उपवास आंदोलन करण्यात आले .
या उपवास आंदोलनात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील , जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील , महानगराध्यक्ष डॉ . ए. जी . भंगाळे , डॉ. राधेशाम चौधरी , माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील ळासाहेब पवार, जिल्हा आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिनदादा सोमवंशी,एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, सेवा दल जिल्हा अध्यक्ष राजेस कोतवाल, शाम तायडे, रवींद्र निकम, परवेज पठाण, जाकीर बागवान, सकीना तडवी, राजेश मंडोरे, शैलेश पाटील, अमजद पठाण,,संजय वराडे, योगेश देशमुखआदींनी सहभाग घेतला .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post