यावल ग
स्ती पथकाची कारवाई
यावल, दि. २५ –
आज रात्री १२. ३० वाजेच्या सुमारास सत्रासेन गावातील शशिकांत भगवान मिस्तरी यांच्या घरातून 14 घनमीटर सागवानी लाकूड तसेच सुनील नरसिंग पावरा यांचे घरातील 13 घनमीटर सागवानी लाकूड असे एकूण 40 हजार रुपयांचे सागवानी लाकूड गस्ती पथकाने जमा केले.
यावल उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर व विभागीय वन अधिकारी उमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक,वनक्षेत्रपाल गस्तीपथक एस आर पाटील यांनी व गस्तीपथक राउंड स्टॉप,
सत्रासेन लासुर राउंड़ स्टॉप यांनी आज सकाळी 12:30 वाजेच्या सुमारास सत्रासेन गावात जाऊन शशिकांत भगवान मिस्तरी यांच्या घरातील 14 घनमीटर व सुनील नरसिंग पावरा यांच्या घरातील 13 घनमीटर सागवानी लाकूड अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीचे जमा करून कार्यवाही केली आरोपी फरार झाले आहे याबाबत वन कायदानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.