Thursday, September 29, 2022

लवकर सरकार स्थापन होईल, चर्चा सुरु आहे – शरद पवार

- Advertisement -

नागपूर : महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला सत्ता स्थापन न करता आल्यामुळे अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. असं असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान,  लवकर सरकार स्थापन होईल, आम्हाला राज्यपालांनी ६ महिन्याचा अवधी दिला आहे असा चिमटा काढत हे सरकार पुढील ५ वर्ष टिकेल याच दृष्टीकोनातून चर्चा सुरु आहे असे सकारात्मक संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

- Advertisement -

“नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल,” असं पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

- Advertisement -

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू. मुस्लिम आरक्षणासंदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये चर्चा करू. सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही. परंतु मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न असेल. येणारे सरकार तकलादू नसेल. महिला मुख्यमंत्रीसंदर्भात काहीच विचार नाही. शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कुणाशीही चर्चा करणार सुरु नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या