सत्ताधाऱ्यांच्या सुचनेनुसार संरक्षण दलांचे काम : बिपीन रावत

0

नवी दिल्ली : आम्ही राजकारणापासून दूरच राहतो. आम्ही सत्तेवर असणाऱ्या सरकारच्या सुचनेनुसार काम करतो, अशा शब्दात नवे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी निवडक माध्यम प्रतिनिधींसमोर या पदापुढील आव्हाने, जबाबदारी आणि अपेक्षा यांचा लेखाजोखा मांडला. त्यावेळी जनरल रावत बोलत होते.

त्यांनी संरक्षण दल प्रमुखांच्या कार्याचे स्वरूप स्पष्ट केले. तीनही सेवा दलांचे कार्य संलग्न करणे आणि तीनही दलांना एक संघ म्हणून कार्यरत करणे, असे कार्याचे मुख्य स्वरूप असेल, असे रावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.

एक संघ म्हणून आम्ही एकत्र काम एकत्र काम केले तर आम्ही 1+1+1 चे उत्तर पाच किंवा सात येईल, असे आमचे उद्दीष्ट आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश सामुहिक प्रयत्नांतून मिळणारे यश अधिक व्यापक किंवा त्याहून मोठे असते. आम्ही ते ध्येय एकात्म भावनेतून साध्य करू, असे ते म्हणाले.

स्रोतांचा अधिक चांगला वापर आणि एकत्र प्रशिक्षण यावर संरक्षण दल प्रमुखांचा रोख असेल, असे रावत यांनी स्पष्ट केले. संरक्षण दलांचे राजकीयकरण होत आहे असा होणाऱ्या आरोपाकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्ही राजकारणापासून लांबच राहतो. सत्तेत असणाऱ्यांच्या सुचनेनुसार आम्ही कार्य करतो.

संरक्षण दल प्रमुख म्हणून तीन दलांशी संबंधित सर्व विषयांवर ते संरक्षण मंत्र्याचे प्रमुख सल्लागार असतील. हा पदभार स्वीकारण्यापुर्वी जनरल रावत यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यांनी शहीद जवचानांना श्रध्दांजली वाहिली. जनरल रावत यांनी मंगळवारी लष्करप्रमुखांचे कार्यालय मंगळवारी सोडले, त्यावेळी माझे डोके आता हलकं झाल्या सारखं वाटतंय अशी भावना व्यक्त केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.