शेंदुर्णी – केंद्रात व राज्यात भाजपा मित्र पक्षाचे सरकार आहे.जनतेच्या मुलभुत समस्या सोडविण्यात हे सरकार सर्वच स्थरावर अपयशी ठरले आहे. भावनिक मुद्दे मांडुन यांनी बेरोजगारी वाढविली.सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राचे खच्चीकरण केले.शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची नुसतीच घोषणा केली.सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षातील नेत्यांना, कार्यकत्यांना ई.डी.तसेच अनेक प्रकारचा त्रास देत आहे.मुख्यमंत्री म्हणतात समोर लढायला पहेलवान नाही मग पंतप्रधान व गृहमंत्री का महाराष्ट्रात सभा घेत फिरत आहे .आता महाराष्ट्रातील जनता यांना त्यांची जागा दाखविणार असुन जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार संजय गरुड यांनाच निवडुन देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी शेंदुर्णीत व्यक्त केला.
राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार शेंदुर्णीत झालेल्या प्रचंड जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी चे उमेदवार संजय गरुड यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर व राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री व भाजपाचे विधानसभेचे उमेदवार गिरीश महाजन यांच्या २५ वर्षाच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचला.भाऊंनी तालुक्याला विकासापासुन वंचित ठेवल्याची टिकास्र सोडले.जनतेला यंदा परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कवीवर्य ना.धों.महानोर, गफ्फार मलिक, अँड. रविंद्र पाटील, अँड. संदिप पाटील, रंगनाथ काळे,विलास पाटील, शिरिष चौधरी, अरुण पाटील, जगन सोनवणे,सौ.सरोजनी गरुड,सौ.वंदना चौधरी,डॉ. ऐश्वर्या राठोड, पारस ललवाणी, सुरेश धारीवाल,प्रदिप लोढा,कैलास पाटील, अँड. ज्ञानेश्वर बोरसे,डी.के.पाटील, प्रफुल्ल लोढा,सागरमल जैन, शंकर राजपुत,दगडु पाटील, शांताराम गुजर व जिल्ह्यातील मित्र पक्षांचे मान्यवर नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संंख्येने हजर होते.
यावेळी भाजपा ,शिवसेनतुन राष्ट्रवादी पक्षात अनेकांनी प्रवेश केला त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.