Wednesday, May 25, 2022

सतर्कतेचा इशारा.. ‘या’ भागात वादळी पावसासह गारपीटीची शक्यता

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्यात ऐन थंडीच्या दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4-5 दिवस काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे दिनांक 8, 9 जानेवारी रोजी विदर्भातल्या काही भागात गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

आज या’ भागात पाऊस

आज दिनांक 7 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. जळगाव, नगरसह, पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज तर उद्या दिनांक ८ रोजी विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुन्हा अवकाळी पाऊस का?

एकापाठोपाठ सातत्याने येणारे पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पचा पुरवठा पूरक ठरल्याने आज दिनांक सात रोजी हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी तर पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वीज आणि मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवणार असून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होणार आहेत तर आज दिनांक सात रोजी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून वादळी पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून म्हणजेच तारीख आठ पासून उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्‍यता असून विदर्भातील अमरावती, अकोला, जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात थंडी कमी झाली आहे.

‘या’ भागाला ‘यलो अलर्ट’

दिनांक 7- नंदुरबार, धुळे, नाशिक
दिनांक 8- जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर
दिनांक 9- जालना, बुलढाणा, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, आणि भंडारा
दिनांक 10- अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या