नवी दिल्ली । आगामी काळ प्रमुख सणासुदीचा काळ असल्याने रेल्वेकडून विशेष ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. दसरा, दिवाळी, छठ पुजा सारखे सण पुढील काळात असल्याने या दरम्यान रेल्वेची संख्या वाढवण्याची मागणी होत असते. शिवाय, रेल्वेंमध्ये गर्दी देखील वाढत असते. हे बाब लक्षात घेता रेल्वेकडून नव्या विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. १२ सप्टेंबरपासून नव्या विशेष रेल्वेंच्या ४० पेअर्स धावणार असून, यासाठी १० सप्टेंबरपासून रिझर्व्हेशन सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लॉकडाउनच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेनची संख्या वाढण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं पावलं उचलण्यास सुरूवात केल्याचे आजच्या निर्णयावरून दिसत आहे.
मुंबई, कोलकाता, लखनऊ, पाटणा, दिल्ली या मार्गांवर विेशेष रेल्वे धावणार आहेत. सध्या महाष्ट्र व पश्चिम बंगाल सरकारशी याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या विशेष रेल्वेच्या नावाने २३० एक्स्प्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.