Sunday, January 29, 2023

सकल धनगर समाज प्रतिष्ठानला न.पा.चा खुला भूखंड विकसित करण्यासाठी आ.अनिल पाटलांकडून १५ लाखांचा निधी

- Advertisement -

अमळनेर (प्रतिनिधी) – सकल धनगर समाज प्रतिष्ठान, अमळनेर या स्वंयसेवी संस्थेस शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचा खुला भूखंड पालिकेने  दिल्याने अमळनेरच्या विकासात भर पडणार आहे. तर हा दिलेला भूखंड विकसित करण्यासाठी आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी यावेळी जाहीर केला. राजे मल्हारराव होळकर व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पालिकेचा खुला भूखंड विकसित करण्यात येणार आहे.

यावेळी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड व माजी आमदार  साहेबराव पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, माजी नगरसेवक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सिलाल भागवत, अमळनेर स्कुल बोर्ड अध्यक्ष नितीन निळे, उपाध्यक्ष मच्छिद्र लांडगे, सचिव एस.सी.तेले,  प्रभाकर लांडगे, संघटक प्रदीप कंखरे, खजिनदार प्रा.जी. एल. धनगर,  प्रा.दिनेश भलकार,  प्रा.आर.पी.धनगर, तुषार इधे, आनंदा हडपे, पंकज धनगर, रमेश शिरसाठ, प्रा.जगदीश भागवत, समाधान भागवत, सुधाकर पवार, गोपीचंद शिरसाठ, दिलीप ठाकरे, सुरेश धनगर, ए.बी.धनगर, योगेश धनगर, बापु धनगर, आर.के.हडपे, गणेश शिंगारे, विशाल देवरे, रविंद्र धनगर, सुनिल धनगर, राहूल धनगर, गणेश शिरसाट, प्रितम रत्नपारखे प्रा दीपक पवार आदी उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे