भडगाव -सागर महाजन
दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरती काही मनुवादी वृत्तीचे लोकांनी भारतीय संविधानाच्या प्रति जाळून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अवमानकारक घोषणा देण्यात आल्या अश्या कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर आद्यप पर्यंत राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल न केल्याने त्याचा निषेध म्हणून भडगाव तालुका संविधान संघर्ष समितीच्या वतीने 18 ऑगस्ट 2018 वार शनिवारी भडगाव बंद चे अवाहन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी खेडकर आण्णा, रमेश कांबळे , अण्णा मोरे,अनिल वाघ,सुरेंद्र मोरे,संजय सोनावणे, रवी अहिरे,रामा पवार,मनोज सोनवणे,रोहिदास जाधव ,रामा जाधव,रवी सोनवणे,विनोद मोरे,सिद्धू सोनवने, नितीन सोनवणे, विशाल सोनावणे, पितांबर खैरनार यांच्या सह हजर होते