संविधान बचाओ समिती तर्फे बेमुदत साखळी उपोषण

0
 सीएए,एनपीआर व एनआरसी त्वरित रदद व्हावा मागणी 
भुसावळ (प्रतिनिधी )-
 सीसीए कायदा ,एन.पी आर  व एन आर सी त्वरित रद्द करण्यात यावा यामागणी करिता   भुसावळ संविधान बचाओ समिती तर्फे बुधवार 15 पासून  तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण  करण्यात आले आहे .याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपती रामनाथ  कोविंद यांचेकडे मागनी करण्यात येवून  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे .
     या साखळी उपोषणात पहिल्या दिवशी हाजी सलीम चूडिवाले, माजी नगरसेवक साबीर शेख, फिरोज शेख, मझहर शेख,अझहर शेख,इमरान खान,  जुनेद खान,नाजिम कादरी, साजिद बागवान, सलीम सेठ चुडी वाले,मुन्नावर खान,शेख रफिक , शिव वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक राजू चौधरी (पटेल ), मुफ़्ती हारून , भूरा बाई सपकाळे , सरदार उस्मान पिंजारी ,इदरीस बागवान यांच्यासह संविधान बचाव समिति सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.