संविधानाच्या मूळ गाभा बद्दलविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना आता बदलण्याची गरज

0

विधानसभेचे माजी अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

धरणगाव,दि. 21-
शहरात झालेल्या जाहीर सभेतील अध्यक्षीय भाषणात मा.भाईंनी देश विघातक कृत्य करणार्‍या व देश तोडणार्‍या प्रवृत्तीचा खरपूस समाचार घेतला.धरणगाव शहर व तालुक्यातील जनतेचे प्रेम अन् जिव्हाळ्यास आज तोड नाही.आपल्या सर्वांच्या प्रेमरूपी आशीर्वादामुळेच मला पुन्हा निवडणूक लढण्याची खरी उर्जा मिळाली.असे भावोद्गगार काढत आपल्या विश्वासाला कधीही आपण तडा जाऊ देणार नाही. राहिलेली सर्वच विकासकामे पूर्ण करत आपल्या विश्वासाची परतफेड केली जाईल,असे आश्वासन माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी आज धरणगावकरांना दिले.
धरणगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित वही तुला व अभिष्टचिंतन सोहळया प्रसंगी ते बोलत होते.कोट बाजार येथील साने पटांगणावर झालेल्या या आनंद सोहळयाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती,पक्षाचे जेष्ठ नेते अरूणभाई गुजराथी होते.पुढे बोलतांना मा.आप्पासाहेब म्हणाले की,गेल्या निवडणूकीत मी संकटात असतांना देखील आपला माझ्यावरील विश्वास व प्रेम थोडेही कमी झाले नाही.जे सर्वागीण विकासाचे स्वप्न मी आपणास दाखवले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपली मेहनत व सहकार्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.*
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी आप्पासाहेब देवकर यांचे तोंडभरून कौतुक केले व शुभाशीर्वाद दिलेत.जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील,माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महंत भगवान बाबा,विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील,माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, गुलामभाई गौस,ऍड.वसंतराव भोलाणे,औंकार माळी यांनी देखील मनोगत व्यक्त करत मा.आप्पासाहेबांचे हाथ बळकट करण्याचे आवाहन केले.*

*वही तुला व नागरी सत्कांर :-*
*कार्यकमाच्या प्रारंभीच मा.आप्पासाहेबांची वही तूला व भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या वह्यांचे नंतर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.व्यासपीठावर महानंदा चे संचालक प्रमोद बापू पाटील,पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती मनोराज पाटील,माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे,डॉ.मिलिंद डहाळे,ऍड.वसंतराव भोलाणे,किशोरबापू कंखरे,माजी नगरसेवक निलेश चौधरी,हाजी इब्राहिम,राजू शेख,जि.प. सदस्य संतोष आंबटकर,प्रफुल्ल देवकर,जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी,विदयार्थी अध्यक्ष धवल पाटील,माजी जि.प. सदस्य रविंद्र पाटील,मोहन पाटील सर,तालुकाध्यक्ष धनराज माळी सर,शहराध्यक्ष हेमंत चौधरी,कार्याध्यक्ष नारायण महाजन,युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे,महिला शहराध्यक्षा सौ.चंद्रकलाताई भोलाणे,माजी महिला शहराध्यक्षा मालतीताई पवार,नीनाताई पाटील,मैनाबाई शेख,कल्पनाताई अहिरे,कार्याध्यक्ष भैय्यासाहेब मराठे,युवक तालूकाध्यक्ष नाटेश्वर पवार,माजी जि.प.सदस्य रविदादा पाटील,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन पाटील,डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.शैलेश सूर्यवंशी,ओबीसी सेल तालूकाध्यक्ष अनिल पाटील,जेष्ठ नेते सुरेशभाऊ नारखेडे,गरीबदास अहिरे,संजय पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते.*
*कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष,विविध गावांचे सरपंच – उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,विविध सेल चे अध्यक्ष,विविध गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते,गावातील व परिसरातील नागरिक बंधू बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपकभाऊ वाघमारे,हेमंत चौधरी,मोहन पाटील सर,अरविंद देवरे (देवरे आबा),निलेश चौधरी,किशोर पहेलवान,धनराज माळी सर,व्ही.टी.कादरी,नईम काझी,नारायण महाजन,वाजिद कादरी,नारायण चौधरी,रविदादा पाटील,नाटेश्वर पवार,गोपाल पाटील,आनंद पाटील,भूषण पाटील,अमोल हरपे,लक्ष्मण पाटील,संभाजी कंखरे,गुलाब महाजन,गोपाल चव्हाण,सचिन सोनवणे,भूपेंद्र पाटील,नितीन भगत,आकाश बिवाल,मोहरा मराठे,सागर वाजपाई,वैभव बोरसे,कृष्णा कंखरे,अजय महाजन,श्रीनाथ साळुंखे,मेघराज पाटील,राहुल पाटील,सागर पाटील आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे बहारदार शैलीत प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील सर यांनी केले.*

Leave A Reply

Your email address will not be published.