संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध

0

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेला हल्ला हा अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. या परिषदेत चीनसह १५ देशांचा समावेश असून हल्ल्यांसाठी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत, अशा जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. या निषेधानानंतर पाकिस्तानला मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी सुरक्षा परिषदेने दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भारताला शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेतील सर्व सदस्य १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी भ्याड हल्ल्यात ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले त्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जारी करण्यात आलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं. दहशतवादी जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. भारताच्या अनेकवेळा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मागणीला चीनने विरोध केला होता.

‘अशा दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारे तसंच रसद पुरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. आम्ही सर्व देशांना आंतरराष्ट्रीय कायदा बंधनं तसंच सुरक्षा परिषदेच्या ठरावाचं पालन करत भारत सरकार आणि इतर सर्व तपास यंत्रणांना सहयोग करण्याचं आवाहन करतो’, असंही सुरक्षा परिषदेत सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.