Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»संयुक्त राष्ट्रांचा काश्मिरबाबतचा अहवाल लष्कर प्रमुखांनी फेटाळला
    ताज्या बातम्या

    संयुक्त राष्ट्रांचा काश्मिरबाबतचा अहवाल लष्कर प्रमुखांनी फेटाळला

    By June 27, 2018No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे. मानवाधिकारांच्या जपणुकीबाबतचा आमचा इतिहास संपूर्ण जगाला ठावूक आहे. काही अहवाल हे विशिष्ट्य हेतूने प्रेरित असतात. काश्मीरची जनता आणि आंतरराष्ट्रीय समुहालाही मानवाधिकारांबाबतची आमची भूमिका माहित आहे. त्यामुळे या अहवालाबाबत आम्ही जास्त विचार करणार नाही. मानवाधिकारांबाबतचे आमचे रेकॉर्ट खूप चांगले आहे.

    जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाबाबत संयुक्त राष्ट्रांनी गेल्या आठवड्यात अहवाल प्रसिद्ध केला होता. तसेच या प्रकरणी तपास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास आयोग बनवण्याचीही शिफासर केली आहे. 2016 पासून काश्मीर खोऱ्यात सुरू झालेल्या विरोधी आंदोलनांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अधिकाधिक बळाचा वापर केला, असे या अहवाला म्हटले होते. या अहवालात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वाणीला भारतीय सुरक्षा जवानांनी ठार केल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. तसेच काश्मीरमध्ये नागरिकांचे अपहरण, हत्या आणि हिसेंसारख्या प्रकारांच्या माध्यमातून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरू असल्याचंही या अहवालातून स्पष्ट करण्यात आले होते.

    दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरसंदर्भात दिलेला अहवाल चुकीचा आणि पक्षपाती असल्याचे भारताने म्हटले आहे. तसेच संयुक्त राष्ट्राने एक प्रकारे आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर हल्ला केल्याचा आरोपही भारताने केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif