प्रकाश आंबेडकरांवर कारवाई करण्याची मागणी ; जिल्हाधिकाऱयांना विविध मागण्यांचे निवेदन
जळगाव;- कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे सरकारने ताबडतोब मागे घ्यावे , वादग्रस्त जागेवर फलक लावणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी , ३ जानेवारी २०१८ रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला जबाबदार असेलेले प्रकाश आंबेडकर यांच्यावर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसह संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ आज शिव प्रतिष्ठानतर्फे मोर्चा काढण्यात आला . मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश फडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली .
मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र भिडे गुरुजींना मुख्यमंत्र्यानी क्लीन चिट दिल्याने भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ शहरातून मोर्चाचे काढण्यात आला . यावेळी मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते . जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ,कि संभाजी भिडे यांच्याविरुद्ध खोटी तक्रार करणाऱ्या महिलेची चौकशी करण्यात यावी , मिलिंद एकबोटे,धंनजय देसाई, वीरेंद्र तावडे आदींची मुक्तता करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आलया आहेत .