Wednesday, February 1, 2023

संत सेवालाल महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

- Advertisement -

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा तालुक्यातील डोहरी तांडा येथे अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात जामनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.

संत सेवा लाल महाराज यांनी केलेले महान कार्य  व त्यांनी जगाला दिलेला बंधुत्वाचा संदेश खरोखरच वाखाण्याजोगा असुन त्यांनी दिलेली एकतेची शिकवण याच मार्गावर मनुष्याने जावे तरच संत सेवालाल महाराजांना वाहिलेली खरी भक्ती ठरेल असे साधना महाजन यांनी सांगितले . संत सेवालाल महाराज यांच्या कतृत्व व जीवनावर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत त्यांची महती पटवुन दिली.

- Advertisement -

याप्रसंगी गावातील असंख्य मुली व महिला यांनी डोक्यावर कलश घेऊन गावात फेरी काढण्यात आली. या प्राणप्रतिष्ठेला जिह्यातून तसेच दुरदुरचे भाविक डोहरी गावात दाखल झालेले होते. तिर्थ प्रसादा सोबत महाअन्नदानाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती. डोहरीतांडा गाव भक्तीमय वातावरणाच्या सागरात डुबलेले पहायला मिळाले.

अशा या नभुतो नभविष्यती प्रसंगी बंजारा समाजाचे प्रमुख समाज भुषण भगवंत सेवक किसनजी राठोड, महंत रायसिंगजी महाराज, महंत भक्तीधाम पोहरा देवी जितेंद्रजी महाराज, जि.प. सदस्य विलास बापु पाटील, डोहरीच्या सरपंच कलाबाई तंवर, स्वीय सहाय्यक दिपक तायडे, ग्रा.पं. सदस्य विकास तंवर, ज्ञानेश्वर तंवर, यांच्या सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठया संख्येने  उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे