मुक्ताईनगर प्रतिनिधी
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी एम जे कॉलेज जळगाव व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत दिनांक 3 व 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या सूत्रसंचालन कार्यशाळेत भाविनी वामनाचार्य व दीपक युवराज पाटील यांना प्रथम तथा द्वितीय पारितोषिक मिळाले.
तसेच काव्यवाचन स्पर्धेत जयश्री हिंगणकर या विद्यार्थिनीला सुद्धा पारितोषिक मिळाले बद्दल महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य डॉक्टर संजय शेखावत इंजिनिअरिंग कॉलेज बांबोरी यांच्या हस्ते ह्या तीनही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आय.डी.पाटील उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक ऐक. जी. कुलकर्णी यांनी मुलांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.