संत मुक्ताबाई पालखी सोहळा उद्या जालन्यात

0

जिल्ह्यात 5 दिवस पालखीचा मुक्कामी
मुक्ताईनगर | प्रतिनिधी

पंढरीनाथाचे भेटीसाठी वारकरी मेळ्यासह निघालेला संत मुक्ताबाई पालखी सोहळा पंधरा दिवसापासून मजलदरमजल करीत देऊळगाव राजा बालाजी नगरीतील शुक्रवार मुक्काम करून पुढील प्रवासासाठी दि.22 रोजी वाघरूळ जि.जालना येथे दुपारचा विसाव्या साठी जालना जिल्ह्यात प्रवेश करील.
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी — मुक्ताईनगर जि जळगाव येथून 8जून रोजी आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवलेल्या सोहळ्याला 310 वर्षाची अखंड परंपरा लाभलेली आहे. 750कीमी अंतराचा सर्वात लांब 34दिवसांचा प्रवास करणारा एकमेव पालखी सोहळा आहे. आतापर्यंत 250.कीमी मार्गक्रमण केले आहे.
जालना जिल्ह्यात पुढील 5 दिवस सोहळा प्रवास करणार आहे. दि. 22 कन्हैयानगर जालना दि. 23काजळाफाटा दि. 24 अंबड दि.25 वडीगोद्री दि.26पाथरवाला बु. नंतर सोहळा बीड जिल्ह्यात प्रवेश करील. संपूर्ण प्रवासात यावर्षी कोठेही पाऊस झाला नसल्याने रणरणत्या उन्हातच वाटचाल चालू आहे यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने पाणीपुरवठा टॅंकर व्यतिरिक्त देवगीरी प्रांत विश्व हिंदु परिषदेने पाणीटॅंकर दिला आहे. जि.प. जळगाव यांनी वैद्यकिय पथकासह दिलेली रुग्णवाहिका वारकरी भाविकांना सेवा देत आहे. पालखीसोबत पुरूष वारकरी पेक्षा महिलांची संख्या अधिक आहे.
वारकर्याचे पाऊसाकरीतासाकडे
सर्वत्र शेतकरीवर्ग पावसाककरीता चिंतातूर असल्याने वारकरी भाविक मुक्ताईकडे जिल्ह्यात व राज्यात चांगले पाऊस व पीकपाणी होवू दे असे साकडे घालत जिल्ह्यात प्रवेश केला.
सोहळ्यात व्यसनमुक्तीचा जागर
संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रवासात प्रत्येक गावी व्यसनाने अनमोल मानवी जीवन कसे मातीमोल होते व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार असे श्रेष्ठ आहेत हे समजावून देत व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करित आहेत. आजपर्यंत अनेकांनी व्यसनमुक्तीची शपथ पालखी सोहळा प्रमुख हभप.रविंद्र महाराज हरणे यांचे कडून घेतली आहे.
शहरातील पालखी मुक्काम
कन्हैयानगरात शनिवारी पालखीचे मुक्काम असून रविवार दि.23 रोजी सकाळी शहरातून गौरक्षण पांजरापोळ येथे दुपार विसावा घेवून शहर मिरवणूक ने अंबड रोडवरील काजळाफाटा वृध्दाश्रम येथे मुक्कामी राहील.
गोदावरी स्नान बिकट
परंपरेने आदिशक्ती मुक्ताबाई पादूकाना पाथरवाला – शहागड दरम्यान गोदावरी स्नान घालण्यात येते यावर्षी पाऊसच नसल्याने स्नानाकरिता गोदावरीत पाणी नसल्याने स्नान बिकट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.