संत ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा गांधीना अभिवादन

0

जळगाव : मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिननिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव व उपशिक्षक मुकेश नाईक यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आणि हुतात्मा दिन याविषयी सविस्तर माहिती दिली. साक्षी शिरसाळे, श्रद्धा कोळी, भावेश पालवे, पायल सोनगिरे या विद्यार्थ्यानी महात्मा गांधी आणि हुतात्मा दिनाविषयी सांगितले.

विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, जया पाटील, माधुरी सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.