संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0

भुसावळ (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत,समस्त धोबी परीट समाजाचे आराध्य दैवत संत गाडगेबाबा यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्‍या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रम संत गाडगेबाबा परीट धोबी संस्था, भुसावळ आणि महाराष्ट्र राज्य परीट धोबी महासंघ (सर्व भाषिक)  यांच्या वतीने व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.डी.सोनटक्के,प्रदेश कार्याध्यक्ष अनिल शिंदे,महिला प्रदेश अध्यक्ष अरुणा रायपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथील समाज मंदिरात पार पडला, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य नाना ठाकरे व जिल्हा संपर्कप्रमुख मंगल शेलोडे यांनी संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुजा,पुष्पहार अर्पण करून भजन म्हटले.यावेळी छाया शेलोडे, सुरेखा ठाकरे,अनीता शेलोडे, प्रविण दहीभाते,सुभाष शिरसाळे, राजु चांदेलकर,आनंदा सुरडकर, शंकर शेल्लोडे, शांताराम जाधव, श्रीकांत घुमारे,भास्कर जामोदकार,अरुण शिरसाळे, दीपक चांदेलकर,नितीन जाधव, शरद शिरोडे, दिलीप जामोदकार व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.