संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सेवा संघर्ष समिती तर्फे शहरात स्वच्छता अभियान

0

बोदवड – संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सेवा संघर्ष समितीच्यावतीने संपूर्ण शहरात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यातून स्वच्छतेचा संदेश यातून देण्यात आला.

अभियानाची सुरुवात मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चद्रंकात पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पुजन करून करण्यात आली. शहरातील प्रभात फेरी मार्गे गांधी चौकात कार्यक्रमाचा समारोप झाला.

यावेळी नगरपंचायतीचे गटनेते देवेंद्र खेवलकर,डॉ.उद्धव पाटील,सईद बागवान,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल,तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी जाधव,नगरसेवक दिपक झांबड,सुनील बोरसे,आनंदा पाटील,धनराज गंगतिरे, नगरसेवक डॉ.सुधीर पाटील,अमोल देशमुख,विनोद मायकर,जाफर मण्यार,शेख कलीम,नईम खान,सेवा संघर्ष समितिचे अध्यक्ष शांताराम कोळी,भास्कर गुरचळ,गोपाल पाटील व सेवा संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नगरसेवक,अधिकारी,व न.पं. साफसफाई कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.