संतापजनक : खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

0

चाळीसगाव  : तालुक्यातील शिरसगाव येथे नाराधमाने खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना काल रविवारी घडलीय.  दरम्यान, नराधमास अटक करण्यात आली असून याबाबत  मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसगाव येथील आरोपी संदीप सुदाम तिरामली 37 याने दि 3 रोजी गावातीलच 5 वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलाऊबी रात्री 8 वाजेच्या सुमारास बलात्कार केला सदर माहिती मुलीने घरात सांगितल्यावर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नाराधमावर गुन्हा दाखल केला तोवर आरोपी पळून गेला होता स पो नि पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार योगेश मांडोळे, पो कॉ शैलेश माळी, गोरख चकोर यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.

 

आरोपीने 2012 मध्ये देखील अशाच प्रकारे 5 वर्षीय बालिकेवर बलात्कार केला होता त्यावेळी मेहुनबरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन त्याला 7 वर्ष शिक्षा झाली होती. 2 महिन्यापूर्वी शिक्षा भोगून आला होता व पुन्हा त्याने बालिकेवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पुढील तपास स पो नि पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.