संजय वराडे व अरुणा पाटील यांना कॉंग्रेस पक्षाने केले निलंबित

0

जळगाव :- ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे व माजी महानगर महिला अध्यक्ष अरुणा पाटील यांना कॉंग्रेस पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोघा माजी पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच पक्षातर कारवाईमुळे अरुणा पाटील व त्यांच्या समर्थकांनी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांना मारहाण करत त्यांच्या तोंडावर काळे फसले होते. यामुळे हि कारवाई करण्यात आली. तसेच सतत पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे संजय वराडे यांना देखील निलंबित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.