संजय राठोडांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले….

0

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी भूमिका मांडली आहे.

 

राऊत म्हणाले, हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत. शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील, असे राऊत म्हणाले.

 

पत्रकारांनी राऊत यांना राठोड यांच्या राजीनाम्याविषयी विचारले. त्यावर राऊत म्हणाले, राजीनामा दिला की नाही, हे मला माहिती नाही. तुम्हाला याची जास्त माहिती असेल, असे म्हणत राऊत यांनी प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळले.

Leave A Reply

Your email address will not be published.