शेंदुर्णी ता.जामनेर : धी.शेंदुर्णी सेकं. एज्यु.को.काँप.सोसायटीचे चेअरमन ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते संजयदादा गरुड यांची जिल्हा नियोजन व विकास समीती सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी सुद्धा त्यांनी सदस्य म्हणुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. चौथ्यांदा त्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत असुन जामनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.