संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर ; उपचारासाठी विदेशी जाण्याची शक्यता

0

मुंबई | बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

शनिवारी संध्याकाळी  संजय दत्तला अस्वास्थ्य वाटू लागल्यामुळे त्याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी संजय दत्तची करोना चाचणीही झाली होती. त्यात ती निगेटिव्ह आल्याने संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आता त्याला लंग कॅन्सर झाला आहे.

आज केलेल्या ट्विटमध्ये संजय दत्तने काय म्हटलं होतं?

‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असं ट्विट संजय दत्तने केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.