‘मी समाजाचा शत्रू आहे मी घरी बसणार नाही’

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीनंतरही शहरात अनेक वाहनचालक,पादचारी रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे मुक्ताईनगरात दिसून आले. संसर्ग रोखण्यासाठी घरातच रहा, असे पोलिस ध्वनिक्षेपकावरून आवाहन करुनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे पाहून घोळका करुन गर्दी करणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.तर काही ठिकाणी वाहन चालकांना ‘मी समाजाचा शत्रू आहे मी घरी बसणार नाही’ असे फलक देऊन पोलिसांनी गांधीगिरी केली.
पोलीस निरीक्षक सोा. सुरेश शिंदे यांचा  मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक सोा. निलेश सोळुंके  पोलीस हवालदार सुधाकर शेजोळे पो.नाईक सपकाळे यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.