संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

0

अमरावती  (प्रतिनिधी): राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना कुठेतरी आळा बसावा याकरिता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यात सुद्धा हा नियम लागू झाला आहे. मात्र संचार बंदी च्या काळात पहिल्याच दिवशी अमरावती करांनी संचारबंदी चा पूर्णपणे फज्जा उडवल्याने.

विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलत. शुक्रवारपासून शहरात संचारबंदी च्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या नागरिकाला कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे आता तरी संचार बंदी च्या काळात फिरणार यांची संख्या कमी होईल व नागरिक  घरातच राहणे पसंत करतील अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाकडून होत आहे .

बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली. मात्र गुरुवारी सकाळपासूनच संचारबंदी चा कुठलाच नियम नागरिक पाडताना शहरात पाहायला मिळाले नाही .शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून आली. प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता . मात्र अमरावतीकर नागरिक पोलिसांना न घाबरता रस्त्यावर फिरताना आढळून येत होते. या सर्व बातम्यांचे वृत्त विविध वृत्तपत्रांसह इलेक्ट्रॉनिक मीडियांनी प्रकाशित केले होते . या वृत्तानंतर जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलीत हा उपक्रम सुरु केला. येत्या काही दिवसात संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडे चार मोबाईल टेस्टिंग युनिट प्राप्त झाले असून याद्वारे आता कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. काल राजापेठ चौकात महापालिकेचे उपायुक्त हे स्वतः रस्त्यावर उतरून या मोहिमेत सहभागी झाले होते. दुपारपर्यंत दीडशेच्या वर नागरिकांच्या टेस्ट या ठिकाणी करण्यात आल्या होत्या.

मध्यप्रदेशातुन येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

अमरावती शहरात सध्या कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने व अमरावतीच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी अनेक रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. यात काही रुग्ण हे मध्यप्रदेशातील सुद्धा आहेत .त्यामुळे आता बैतूल, खंडवा , छिंदवाडा येथील नागरिकांना कोरोनाची चाचणी केल्यावरच अमरावती जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र यातून मालवाहतूक व ॲम्बुलन्स यांना सूट देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.