लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथे दि.१ एप्रिल २०२० रोजी संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन जणांवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असून घराबाहेर पडण्यास शासनाकडून सक्त मनाई करण्यात आली आहे तरी दि.१/४/२०२० रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पथक लासुर गावात पेट्रोलिंग करत असताना लासुर येथील देविदास पितांबर महाजन(वय २९) तसेच सौपानी खान सलीम खान ठोके(वय 20) गावात हिंडताना आढळून आले.आरोपींना कारण विचारले असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पो.काँ सुनील कोळी यांचा फिर्यादीवरून भाग ६ गु र न ३००७/२०२० भा.द.वि कलम १८८ अनुसार ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि संदीप आराक यांचा मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ राजू महाजन करीत आहे.