संघानेही भाजपाची साथ सोडली : मायावती

0

लखनौ :- लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी त्यांच्या ट्विटरवरून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाला लगावला आहे.

मोदींनी देशवासियांना मोठी आश्वासनं दिली होती. ही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाल्याने संघाने भाजपपासून स्वत:ला दूर केलं आहे. त्यामुळेच या संपूर्ण निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक भाजपसाठी मतं मागताना दिसत नाहीत. यावरून मोदींचं राजकारण संपुष्टात आल्याचं अधोरेखित होतंय, असं मायावती यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या सरकारच्या काळात गुंडगिरीला आळा घातला जाऊ शकला नाही. मग या पक्षांकडून दहशतवादाला कसे रोखले जाऊ शकेल, असा सवाल समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीला विचारला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.