संगणक परिचालक संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन

0

जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायती झाल्या आॅफ लाईन – संगणक परिचालकांची उपासमार

जामनेर (प्रतिनिधी) : – राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद मधील संगणक परीचालक संघटनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याबाबत दि.३० नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याबद्दल व संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व संगणक परिचालक दि.१९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलनावर जात असल्याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांना तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी ग्रामविस्तार अधिकारी अशोक पालवे,देवचंद लोखंडे,संघटनेचे अध्यक्ष जितेद्र माळी,उपाध्यक्ष प्रदिप चोपडे,सचिव तुषार पाटील यांच्यासह तालुक्यातील  संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कामबंद आंदोलनात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व संगणक परिचालक सामील झालेले आहे.

प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे 

१.राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परीचालकाना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे.

२. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्री मंडळाने मंजुरी दिली असून त्याचा शासन निर्णय काडून त्यांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.

३.सर्व संगणक परीचालकांचे मानधन १४ व्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रति महिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे.

४.सर्व संगणक परीचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे.

५.ज्या ग्राम्पान्चायातिनी आपले सरकार प्रकल्पासाठी निधी दिला नाही तेथील संगणक परीचालकांचे एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व मानधन शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून करणे.

Leave A Reply

Your email address will not be published.