श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रातर्फे ११ हजार १११ रुपयाची मदत

0

एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील उत्राण येथील श्री.स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 11 हजार 111 रुपये मदत निधी तहसीलदार एरंडोल अर्चना खेतमाळीस यांच्याकडे सोपविण्यात आला.

आध्यात्मिक सेवे सोबतच सामाजिक सेवा आनंदाने व आत्मीयतेने करावी असे श्री स्वामी समर्थ माऊली सांगतात. त्याच कर्तव्याची आठवण ठेऊन श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक व बालसंस्कार केंद्र उत्राण यांनी सध्या सुरू असलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाला थोड्या फार प्रमाणात आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र उत्राण  वतीने रक्कम रुपये 11,111/-(रुपये अकरा हजार एकशे अकरा मात्र )धनादेश तहसीलदार अर्चना खेतमाळीस एरंडोल यांना देण्यात आला.

यावेळी एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती अनिलभाऊ महाजन,प्रातिनिधिक सेवेकरी  स्वरूपात जेष्ठ  सेवेकरी भिला कथ्थु महाजन,विजय पाटील,राजाराम माळी, जगन्नाथ धामणे,प्रमोद महाजन, दिपक महाजन आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.