कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी – आज श्री.संत शिरोमणी रोहिदास(रविदास)महाराज यांची 643 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष्यस्थानी भानुदास विसावे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) म्हणून लाभले होते, त्यावेळी कजगांव ग्रा.पं.लोकनियुक्त सरपंच सौ. वैशालीताई पाटील यांनी प्रतिमापूजन केले, तेथे ग्रा.पं.उपसरपंच सौ.संगिताताई मोरे, समाजसेवक दिनेश पाटील तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाअध्यक्ष उत्तम दौलत मोरे व तालुका अध्यक्ष रवीभाऊ अहिरे, सिद्धार्थ भद्रे, ग्रा.पं.सदस्य अनिल महाजन खुशाल भोई मराठी शालेय समिती अध्यक्ष दिनेश पाटिल, ग्रा.पं.कर्मचारी तसेच बबडू नाना, रधुनाथ महाजन, संजू बाबा,भूरा भाऊ, यशवंत मोरे, मनोज मोरे, रामदास भालेराव,वाल्मीक मोरे, विनोद अहिरे, सोमनाथ मोरे व सर्व चर्मकार समाज बांधव व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.