धरणगाव, प्रतिनिधी – येथील श्री व्यंकटेश पतसंस्थेतर्फे कर्जदाराच्या वारसास आर्थिक मदत
श्री व्यंकटेश पतसंस्थेचे सभासद सौ.कल्पनाबाई शामकांत पाटील यांचे गेल्या पावसाळ्यात भावरखेडे येथे शेतांत काम करत करीत असताना विज अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचा पतसंस्थेने अपघाती विमा काढलेला होता. विम्याचा क्लेम रू.१ लाखाचा चेक ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी दिलीप पांडे साहेब एरंडोल यांच्या सहकार्याने मिळाला. सदरचा चेक मृताच्या वारसास शामकांत पाटील भवरखेडा यांना देतांना पतसंस्थेचे चेअरमन श्री प्रशांत केले, व्हा चेअरमन श्री अजय मालपुरे, संचालक चंद्रशेखर वाणी, प्रविणकुमार येवले, नितीन अमृतकर, चंद्रशेखर कुडे, दिनेश येवले, भगवंत येवले, प्रकाश वाणी, मॅनेजर किरण वाणी व विमा प्रतिनिधी प्रेमचंदजी मेहेर हे उपस्थित होते.

